सरकारने अभ्यास वर्ग घेऊन नरेंद्र मोदींचे मार्गदर्शन घ्यावे – मुनगंटीवार

July 4, 2011 4:41 PM0 commentsViews:

04 जुलै

शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये राज्य सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे सरकारने अभ्यास वर्ग घेऊन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी याचे मार्गदर्शन घ्यावे अशी खरमरीत टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी केली. कोल्हापुरात भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठक सुरु आहे. आत्तापर्यंत मंत्रिमंडळाची अठरा वेळा बैठक होण्याची गरज होती.

पण मंत्रिमंडळामध्ये असणार्‍या मतभेदामुळे फक्त तेरा वेळाच बैठक झाली. त्यामुळ मंत्रिमंळाची तंटामुक्ती करण्याची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटले आहेत. भाजपातील अंतर्गत धुसफुसीबद्दल मात्र त्यांनी जास्त बोलणं टाळलं. गोपीनाथ मुंडे आणि अन्य नेत्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. त्यामुळे कोणतीही शंका बाळगण्याची गरज नाही असं स्पष्टीकरणही मुनगंटीवार यांनी दिलं.

close