डे हत्ये प्रकरणी अटकेतील 7 जणांना 8 जुलैपर्यंत कोठडी

July 4, 2011 4:46 PM0 commentsViews: 5

04 जुलै

मिड डे चे क्राईम एडिटर जे.डे यांच्या हत्ये प्रकरणी अटक करण्यात आलेल्या छोटा राजन गँगच्या सात जणांना 8 जुलै पर्यत पोलीस कोठडी देण्यात आली आहेत. यावेळी काही महत्वाचे मुद्दे कोर्टा समोर मांडल्याने या आरोपींच्या कोठडीत वाढ करण्यात आली. जे.डे यांच्या हत्ये बाबत गेल्या सोमवारी 7 जणांना अटक करण्यात आली.

हे सर्व छोटा राजन गँगचे महत्वाचे गुंड आहेत. या सात जणांत सतीश कालिया हा शूटर आहे. याने प्रत्यक्षात जे.डे यांच्या गोळ्या झाडल्या आहेत. सतीश काल्या,अनिल वाघमोडे, अरुण ढोके, सचिन गायकवाड, मंगेश अगनवे, निलेश शेंडगे आणि अभिजीत शिंदे अशी या सात जणांची नावं आहे. त्यांना आज दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं.

यावेळी प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोर्टात झालेल्या सुनावणीत सरकारी वकिलांनी अनेक महत्वाचे मुद्दे मांडलेत. अटक आरोपींना महाराष्ट्राच्या बाहेर अटक करण्यात आली. यामुळे त्यांनी इतर राज्यात काही गुन्हे केलेत का याचा तपास करायचा आहे. त्याचप्रमाणे याच प्रकरणात विनोद चेंबूर यालाअटक करण्यात आली.

या सर्वांचे समोरासमोर चौकशी करायची आहे. त्याच प्रमाणे हे सर्व संघटित गुन्हेगारी शी किती संबधी आहेत. याचा ही तपास करायचा आहे. असे अनेक मुद्दे सरकारी वकिलांनी मांडल्याने या आरोपींच्या कोठडीत वाढ करण्यात आली.

close