कलमाडींना कारागृहात चहा-नाश्ता देणारे अधीक्षक बडतर्फ

July 4, 2011 5:18 PM0 commentsViews: 3

04 जुलै

तिहारमधील व्हीआयपी कैद्यांना विशेष वागणूक मिळत असल्याचे तिहार जेल प्रशासनाने अखेर मान्य केलं. तिहार जेलमधील घटना उघडकीला आल्यानंतर जेल अधीक्षकांची ताबडतोब पोर्ट ब्लेअरला बदली करण्यात आली होती. त्यांना आता बडतर्फ करण्यात आलंय.

30 जून रोजी ट्रायल कोर्टाचे न्यायाधीश ब्रिजेश कुमार गर्ग यांनी तिहार जेलला अचानक भेट दिली. तिथं त्यांना धक्कादायक दृश्य दिसलं.कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले सुरेश कलमाडी जेल अधीक्षकासोबत जेल नंबर 4 मध्ये चहा आणि अल्पोपहार घेत होते.

न्यायाधीशांच्या म्हणण्यानुसार जेलमध्ये असा पाहुणचार मिळणारे केवळ कलमाडी हे एकमेव कैदी नाहीत. नितीश कटारा हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेले विकास यादव आणि विशाल यादव जेलमधील गार्डनमध्ये वेळ उलटून गेली तरी फिरत होते. या घटनेमुळे तिहार जेल प्रशासन चांगलंच अडचणीत आलं.

जेलमधल्या सर्व कैद्यांना समान वागणूक मिळत असल्याचा दावा प्रशासन नेहमीच करतंय. पण, व्हीआयपी कैद्यांना व्हीआयपीच ट्रीटमेंट मिळते हेच सत्य आहे.

close