भट्ट पारसोलमध्ये राहुल गांधींची पदयात्रा

July 5, 2011 9:16 AM0 commentsViews: 2

05 जुलै

गेल्या महिन्यात मायावतींविरोधात उत्तरप्रदेशातच आंदोलन पुकारणार्‍या राहुल गांधींना आता पुन्हा एकदा मायावतींना आव्हान दिलं आहे. राहुल गांधी आज सकाळपासून पुन्हा एकदा भट्ट पारसोलच्या दौर्‍यावर गेले आहेत. भट्ट पारसोलपासून अलीगढपर्यंत त्यांनी आज सकाळी पदयात्रा सुरू केली.अलीगढमध्ये काँग्रेसची 9 जुलैला महाकिसान रॅली होणार आहे. मात्र या रॅलीसाठी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी भट्ट आणि परसोलमध्ये परवानगी नाकारली होती. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ही पदयात्रा काढली आहे.

close