‘ देशद्रोही ‘ वर अखेर बंदी

November 13, 2008 7:57 AM0 commentsViews: 1

3 नोव्हेंबर, मुंबईवादग्रस्त देशद्रोही या चित्रपटाच्या प्रदर्शनावर महाराष्ट्र सरकारनं अखेर बंदी घातली. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास दोन प्रांतीय भाषकांत तेढ उत्पन्न होईल, असं कारण देत राज्य सरकारनं या चित्रपटाच्या प्रदर्शनावर पुढील दोन महिने बंदी घातली. गेले वर्षभर मराठी आणि उत्तरभारतीयांमध्ये झालेल्या वादावर हा चित्रपट आधारित आहे. राज्य सरकारनं मुंबई पोलिसांना या चित्रपटावर अहवाल तयार करायला सांगीतलं होतं. पोलीस आयुक्त हसन गफूर यांनी काल हा अहवाल सादर केला.या चित्रपटातील संवाद कमालीचे वादग्रस्त असून सध्याच्या वातावरणात या चित्रपटावर बंदी घालणे योग्य ठरेल, अशी शिफारस आयुक्तांनी या अहवालात केली.कमाल खान हे या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक आहेत. मनसेनंही या चित्रपटावर आक्षेप घेतला होता. दरम्यान या बंदीला कोर्टात आव्हान देणार असल्याचं देशद्रोही चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक कमाल खान यांनी स्पष्ट केलं आहे. मनसेला या चित्रपटाबाबत आक्षेप नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

close