पद्मनाभस्वामी मंदिराचा दुसरा दरवाजा उघडला

July 5, 2011 1:11 PM0 commentsViews: 11

05 जुलै

केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील शेवटचे दोन गुप्त तळघर काल उघडण्यात आले. त्यातली संपत्ती मोजण्याचे काम सुरू आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत हे तळघर उघडण्यात आले. गेल्या आठवड्यात उघडलेल्या पहिल्या तळघरात तब्बल 1 लाख कोटींची संपत्ती सापडली होती. त्यात सोने आणि चांदीच्या दागिन्यांचा महाखजिना सापडला. गेल्या 130 वर्षांपासून हे तळघर बंद होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार गेल्या आठवड्यात ते खुले करण्यात आले. दरम्यान मंदिरात सापडलेली संपत्ती मंदिराच्याच मालकीची असल्याचे केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी स्पष्ट केले. मंदिराला सरकार कडक सुरक्षा पुरवेल असंही त्यांनी सांगितले आहेत.

close