मारियाला चित्रपटात नो एन्ट्रीसाठी भायुमोची निदर्शन

July 5, 2011 10:55 AM0 commentsViews: 2

05 जुलै

नीरज ग्रोव्हर हत्येप्रकरणी 3 वर्षाची शिक्षा भोगून बाहेर आलेली मारिया सुसायराज हिला आपल्या चित्रपटात घेण्याची तयारी रामगोपाल वर्मा यांनी दाखवली होती. या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील राम गोपाल वर्मा यांच्या कार्यालयापुढे निदर्शनं केली.

तसंच त्यांना याविषयी पत्रही दिलं. पण आता रामगोपाल वर्मा यांनी भाजप युवा मोर्चाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केलीय. नीरज ग्रोव्हर हत्याप्रकरणी दोषी ठरवलेल्या मारिया सुसाईराजला सिनेमात घ्यायला आपली हरकत नसल्याचं वर्मा यांनी ट्विटरवर लिहिलं होतं.

close