माऊलींच्या पालखीचा आज सोलापूरमध्ये प्रवेश

July 5, 2011 10:58 AM0 commentsViews: 3

05 जुलै

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने आज सोलापूर जिल्ह्यात धर्मापुरी या गावातून प्रवेश केला. यावेळी फुलांची सलामी देऊन पालखीचे स्वागत करण्यात आलं. आजच्या पालखीचा मुक्काम नातेपुते इथे असणार आहे. त्यानंतर उद्या होणार्‍या पहिल्या गोल रिंगणाकडे वारकर्‍यांचे लक्ष लागलं आहेत.

उद्या सदाशिवनगरला पहिलं गोल रिंगण रंगेल. यापूर्वीचं पहिलं उभं रिंगण चांदोबाचा निंब इथे झालं होतं. वारकर्‍यांनी टाळ मृदुंगाचा गजर करत आणि माऊली माऊलीच्या जयघोषात आता धर्मापुरीहून नातेपुतेच्या दिशेने प्रस्थान केलं आहे. सातारा जिल्हयाची हद्द संपून सोलापूरची हद्द सुरु झाल्याने दोन्ही प्रशासनाचे अधिकारी हजर होते.

close