बेकरी गोळीबार प्रकरणी रामदेव त्यागी यांची निर्दोष सुटका

July 5, 2011 1:43 PM0 commentsViews: 6

05 जुलै

मुंबईत 1993 मध्ये सुलेमान बेकरी गोळीबार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने पोलीस सहआयुक्त रामदेव त्यागी यांची निर्दोष सुटका केली. तब्बल 18 वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर हा निकाल लागला आहे. 1993 च्या दंगलीच्या वेळी मोहम्मद रोड येथील सुलेमान बेकरीत काही संशयास्पद व्यक्ती लपल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती.

त्यानुसार तेव्हाचे सह पोलीस आयुक्त रामदेव त्यागी आणि त्यांच्या पथकाने बेकरीत घुसून गोळीबार केला होता. या गोळीबारात 9 जणांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण खूप गाजलं होतं आणि पोलिसांवर तीव्र टीका झाली होती. तिथं गोळीबार करणार्‍या पोलीस पथकाविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

यात त्यागी यांच्यासह 17 जणांनावर मुंबई सेशन कोर्टात केस चालली होती. त्यापैकी त्यागी यांच्याबरोबर 9 जणांना कोर्टाने निर्दोष ठरवलं होतं. मुंबई हायकोर्टानंही हाच निकाल कायम ठेवला होता. आता सुप्रीम कोर्टानंही त्यागी यांना निर्दोष ठरवलं आहे.

close