गुरूनानक जयंतीचं महत्त्व

November 13, 2008 4:19 AM0 commentsViews: 71

13 नोव्हेंबरप्रेम,सेवा आणि एकता या मूल्यांचा संदेश देणार्‍या गुरूनानक यांची आज जयंती आहे.इ.स. 1469 ते 1539 असा गुरूनानकांचा काळ मानला जातो.समाजसुधारणावादी, प्रागतिक विचारांचे संत म्हणून नानकदेवांची ख्याती होती. आपल्या लिखाणातून त्यांनी स्त्रीयांच्या दुर्दशेविरुद्ध कोरडे ओढले.स्त्री-पुरूष समानतेवर त्यांनी भर दिला.1497 ते 1521 असा जवळजवळ 24 वर्ष त्यांनी प्रवास केला.मक्का,मदिना, श्रीलंका अफगाणिस्थान असे देश विदेशात ते फिरले.त्यांच्या या प्रवासाला उदासी असं विशिष्ट नाव आहे.उदासी म्हणजे विरक्त वृत्तीनं केलेलं देशाटन.लोकसंवाद आणि त्यातून जनजागृती हे त्यांच्या प्रवासाचं वैशिष्ट्य.सर्वसामान्य माणसांच्या भाषेत त्यांना पटेल,रुचेल,आणि पचेल असं तत्वज्ञान त्यांनी सांगितलं.त्यांच्या अखेरच्या काळात त्यांनी सामुहिक शेतीचे प्रयोग केले. जीवनाच्या अखेरपर्यंत ते प्रसन्नपणे, निरपेक्ष आणि विधायक असं समाजाला देत राहिले.

close