कोल्हापुरात शिवसेनेचं ‘बांगड्या फोडो’ आंदोलन

July 5, 2011 11:07 AM0 commentsViews: 6

05 जुलै

कोल्हापूर – सांगली रस्त्याचे चौपदरीकरण व्हावे या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनादरम्यान महिलांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना बांगड्या भेट देण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी बळाचा वापर करत ह्या आंदोलक महिलांना ताब्यात घेवून त्यांना अटक केली आणि आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला.

पण कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर आंदोलनस्थळावर आल्यानंतर महिलांनी त्यांच्या नेतृत्वाखाली 'बांगड्या फोडो' आंदोलन केलं. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकामध्ये झटापट झाली. संतप्त झालेल्या आंदोलकांनी पोलिसांवर बांगड्या भिरकावल्या. पोलिसी बळाचा वापर करुन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्यामुळे ह्या पुढचं आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शिवसैनीकांनी दिला.

close