एमसीएच्या निवडणुकीआधी पवार ‘पॅव्हेलियन’मध्येच

July 5, 2011 2:33 PM0 commentsViews: 2

05 जुलै

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला नाट्यमय वळण मिळालं आहे. असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष शरद पवार यंदा निवडणूक लढवणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. याबद्दलची अधिकृत घोषणा उद्या होणार आहे.

असोसिएशनच्या घटनेनुसार कार्यकारिणीची निवडणूक लढवणार्‍या पदाधिकार्‍यांचे मुंबई किंवा ठाणे परिसरात कायमस्वरुपी वास्तव्य असणे गरजेचं आहे. शरद पवार यांनी खासदारकीची निवडणूक लढवताना मात्र आपल्या प्रतिज्ञापत्रात पुणे आणि बारामतीचा पत्ता दिला होता.

त्यामुळेच कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करूनच निवडणूक न लढवण्याचा निर्णय पवारांनी घेतला. अध्यक्षपदासाठी पवारांसोबत विलासराव देशमुख आणि क्रिकेटर दिलीप वेंगसरकर शर्यतीत आहेत.

मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. कालचे मित्र आता प्रतिस्पर्धी बनले आहे. भारताचे माजी कॅप्टन दिलीप वेंगसरकर यांनीही आता मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीसाठी क्रिकेटर्सचे पॅनेल उभे करण्याचे जाहीर केलं.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात झाली. अध्यक्षपदासाठी शरद पवार निवडणूक लढवणार की विलासराव देशमुख याबाबतचा गोधळ अजुनही कायम आहे.

पण या सगळ्यात दिलीप वेंगसरकर यांनी मात्र खेळाडू जिंदाबादचा नारा दिला आहे. राजकारण्यांपेक्षा खेळाडूच्या हाती संघटनेची सुत्र द्या असं आवाहनच त्यांनी केलं. माजी क्रिकेटर बलविंदर सिंग संधु, कर्सन घावरी, मिलिंद रेगे, यांनी वेंगसरकर यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

वेंगसरकर यांच्या पॅनेलला महाडदळकर ग्रुपचं तगडं आव्हान असणार आहे. त्यंाच्या ग्रुपमध्ये आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय पातळीवरचा क्रिकेटर नाही. पण तरीही गेल्या वर्षी याच ग्रुपला सर्वात जास्त मतं पडली होती.

एमसीएचे अध्यक्ष झाल्यावर शरद पवार यांनी सुनील गावसकर यांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट सुधार समिती स्थापन करून खेळाशी संबधित सारी सुत्र त्यांनी खेळाडूंकडेच सोपवली होती. पण ही समिती फार प्रभाव पाडू शकलेली नाही. त्यामुळे वेंगसरकर यांना या निवडणूकीसाठी जोरदार फिल्डिंग लावावी लागणार आहे.

close