नीरज हत्याकांड प्रकरणी राज्य सरकार हायकोर्टात अपील करणार !

July 5, 2011 4:03 PM0 commentsViews: 1

05 जुलै

नीरज ग्रोव्हर हत्याकांड प्रकरणात आता राज्य सरकार हायकोर्टात अपील करणार आहेत. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ही माहिती दिली. या प्रकरणात मारिया सुसायराज हिची तीन वर्षांनंतर सुटका झाली. याविरोधात अपील करणार असल्याचे पाटील यांनी सांगितलं.

नीरज ग्रोव्हर हत्याकांड प्रकरणी मागील आठवड्यात कोर्टाने या प्रकरणावर आपला निर्णय दिला. नीरजची हत्या करणार्‍या जेरोम मथ्यूला 10 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.तर अगोदरच शिक्षा भोगत असलेली अभिनेत्री मारिया सुसायराज तीन वर्षाची शिक्षा भोगून सुटका झाली आहे. मारियाला झालेली शिक्षा अपुरी असल्याची प्रतिक्रिया नीरजच्या मित्र परिवारांने व्यक्त केली होती. यासाठी नीरजला योग्य न्याय देण्यात यावा मागणी साठी मेणबत्ती मोर्चा ही काढण्यात आला होता. आता राज्य सरकारने हायकोर्टात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे.

close