‘देल्ही बेली’चा गल्ला जमला ‘बुढ्ढा’नावानेच दमला

July 5, 2011 4:41 PM0 commentsViews: 8

सोमेन मिश्रा, मुंबई

05 जुलै

बॉलीवूडसाठी हा वीकेण्ड अगदी धडाकेबाज ठरला. दोन मोठ्या बॅनरचे सिनेमे रिलीज झाले. अर्थात गर्दी होती ती देल्ही बेलीला. या सिनेमांचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट

आमीर खान प्रॉडक्शनने पुन्हा एकदा ती जादू केली. हिंग्लिश सिनेमा, अनेक अपशब्दांचा वापर, आणि थिरकती तरुणाई. देल्ही बेलीला प्रचंड प्रतिसाद नसता मिळाला तरच आश्चर्य. इम्रान खान, विर दास आणि कुणाल रॉय यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली. अभिनय देवचे दिग्दर्शन लोकांना आवडलं आणि सिनेमाचं ओपनिंग झालं 50 ते 70 टक्के.

एकूण 1200 स्क्रिन्समध्ये हा सिनेमा रिलीज झाला. शुक्रवारचंच ओपनिंग होतं 7.15 कोटींच. वीकेण्डला ते पोचलं 26.4कोटींवर. देल्ही बेली बनलाय 24 कोटींचा. दोन दिवसातच पैसे वसूल झाले. आणि समीक्षकांनीही सिनेमाला 3 ते 4 स्टार्स दिले.

बुढ्ढा होगा तेरा बाप सिनेमाही चर्चेत होता. अमिताभ बच्चनचे जुने डायलॉग्ज, गाणी, त्यांची स्टाइल इतकी जमेची बाजू असतानाही सिनेमाचं ओपनिंग झालं 15 ते 25 टक्के.

शुक्रवारी सिनेमाचे कलेक्शन झालं 1.91कोटी. वीकेण्डपर्यंत ते 6.27 कोटींपर्यंत पोचलं. बुढ्ढा होगा तेरा बाप सिनेमा 17 कोटींचा बनला. पण सिनेमाचे टीव्ही राइट्स आधीच विकले गेल्याने काही प्रश्न नाही. सिनेमाला समीक्षकांचीही फार पसंती मिळाली नाही. तरुणांनी तरुणांच्या सिनेमाला पसंती दिली. अँग्री ओल्ड मॅनचा करिष्मा मात्र कमी झाला एवढं नक्की.

close