अँड्र्यू सायमंड्सचं टेस्ट टीममध्ये पुनरागमन

November 13, 2008 8:40 AM0 commentsViews: 3

13 नोव्हेंबर, सिडनीऑस्ट्रेलियाचा वादग्रस्त क्रिकेटर अँड्र्यू सायमंड्सने टेस्ट टीममध्ये पुनरागमन केलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध पुढच्या आठवड्यात सुरू होणार्‍या टेस्ट सिरीजसाठी तेरा जणांच्या ऑस्ट्रेलियन टीममध्ये सायमंड्सचा समावेश करण्यात आला आहे. भारताविरुद्ध नागपूर टेस्टमध्ये बारा विकेट्स घेणार्‍या जेसन क्रेझाचीही निवड या टीममध्ये झाली आहे. न्यूझीलंड बरोबरची पहिली टेस्ट ब्रिस्बेन इथं होणार आहे. 2008 च्या ऑगस्टमध्ये महिन्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत बांग्लादेश विरुद्धची सिरीज सुरु असतानाच टीममधून काढून टाकलं होतं. त्यानंतर भारत दौर्‍यासाठीही त्याची टीममध्ये निवड झाली नव्हती. पण भारताविरुद्‌ध ऑस्ट्रेलियन टीमला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर अँड्र्यू सायमंड्सला टीममध्ये पुन्हा घेण्यात यावं, असं मत मॅथ्यू हेडनसह अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी व्यक्त केलं होतं.

close