माऊलींचं गोल रिंगण रद्द

July 6, 2011 9:59 AM0 commentsViews: 3

06 जुलै

ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सदाशिवनगर इथलं रिंगण रद्द झालं आहे. ट्रॅफिकची व्यवस्था नीट नव्हती तसेच पालखी ठेवण्याची जागा व्यवस्थित नव्हती. त्यामुळे हे रिंगण रद्द झालं असं सांगण्यात येत आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं हे पहिलचं गोल रिंगण असतं. अशा प्रकारे रिंगण रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सगळ्या दिंड्याही रिंगणस्थळी दाखल झाल्या होत्या. मात्र झेंडेकरी ट्रफिकमुळे वेळेवर पोहोचू शकले नाहीत. या सगळ्या मानापमानाच्या प्रकरणामुळेच रिंगण रद्द झाल्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय. रिंगण रद्द झाल्यानं माऊलींची पालखी आता पुढे माळशिरसकडे निघाली आहे. पण शेकडो वर्षांची परंपरा मोडल्याने वारकरी नाराज झाले आहेत.

माऊलींच्या पालखी सोहळ्यात सोलापूरमधील सदाशिवनगरचा आजचा रिंगण सोहळा रद्द होण्याला सदाशिवनगरच्या कारखान्याचे अधिकारीच कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. मात्र याला प्रशासनच जबाबदार असल्याचे कारखाना व्यवस्थापनाचं म्हणणं आहे. अशी माहिती प्रतापसिंग मोहिते पाटील यांनी आयबीएन लोकमतला दिली.

close