एमसीएच्या निवडणुकीसाठी विलासराव देशमुख उत्सुक

July 6, 2011 10:25 AM0 commentsViews: 2

06 जुलै

एमसीएच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याचे विलासराव देशमुख यांनी आयबीएन-लोकमतकडे आपलं मत व्यक्त केलं आहे. याबाबत संध्याकाळपर्यंत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितलं. पण विलासराव देशमुखांचा निर्णय हा शरद पवारांच्या भुमिकेवर अवलंबून आहे. पवारांनी पाठिंबा दिला तरचं विलासराव देशमुख निवडणुकीच्या रिंगणात उतरतीलं अशी चर्चा आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला काल नाट्यमय वळण मिळालं. असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष शरद पवार यंदा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. याबद्दलची अधिकृत घोषणा आज होणार आहे.

असोसिएशनच्या घटनेनुसार कार्यकारिणीची निवडणूक लढवणार्‍या पदाधिकार्‍यांचे मुंबई किंवा ठाणे परिसरात कायमस्वरुपी वास्तव्य असणे गरजेचं आहे. शरद पवार यांनी खासदारकीची निवडणूक लढवताना मात्र आपल्या प्रतिज्ञापत्रात पुणे आणि बारामतीचा पत्ता दिला होता. त्यामुळेच कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करूनच निवडणूक न लढवण्याचा निर्णय पवारांनी घेतला. अध्यक्षपदासाठी पवारांसोबत विलासराव देशमुख आणि क्रिकेटर दिलीप वेंगसरकर शर्यतीत आहेत.

close