प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक मणी कौल यांचे निधन

July 6, 2011 11:16 AM0 commentsViews: 5

06 जुलै

प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक मणी कौल यांचं निधन झालं आहे. त्यांच्या उसकी रोटी, आषाढ का एक दिन, दुविधा, इडियट या चित्रपटांना फिल्मफेयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 1969 मध्ये कौल यांचा पहिला चित्रपट आला. उसकी रोटी या चित्रपटाने भारतीय चित्रपटाच्या नव्या युगाची सुरुवात करुन दिली.1971 मध्ये त्यांची 21 व्या बर्लीन फिल्म फेस्टिवलमध्ये ज्युरी म्हणून निवड झाली होती. मणी कौल यांचा जन्म राजस्थानमधील जोधपूर इथं झाला. गेल्या काही दिवसांपासून मणी कौल कॅन्सरने आजारी होते.

close