टिळक इंटरनॅशनल स्कूल अखेर झुकले; 8 विद्यार्थ्यांना प्रवेश

July 6, 2011 11:26 AM0 commentsViews: 3

06 जुलै

शिक्षण उपसंचालकांच्या निर्णयानंतर घणसोलीच्या त्या आठही विद्यार्थ्यांना शाळेत पुन्हा प्रवेश देण्यात आला आहे. गेल्या वर्षी फी वाढीविरोधातल्या आंदोलनात पालक सहभागी झाल्यामुळे नवी मुंबईतल्या घणसोली इथल्या टिळक इंटरनॅशनल स्कुलमधून आठ विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाने शाळेतून पहिल्याच दिवशी काढून टाकलं होतं.

इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या आठ विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. वारंवार बैठका होऊनही या विद्यार्थ्यांना शाळेत बसू दिलं जात नव्हतं. आयबीएन लोकमतने याबाबत पाठपुरावा केला होता. अखेरीस शिक्षण उपसंचालकांनी याची दखल घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत पुन:प्रवेश देण्याचे व्यवस्थापनाला आदेश दिले होते. या आदेशाचे आता व्यवस्थापनाने पालन करत विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला. त्यामुळे आजपासून या विद्यार्थ्यांची शाळा खर्‍या अर्थाने सुरू होणार आहे.

close