विद्यार्थ्यांनी काढली तबाखू विरोधात रॅली

July 6, 2011 12:09 PM0 commentsViews: 46

06 जुलै

तंबाखूमुक्त पुणे करण्यासाठी सलाम मुंबई फेडरेशन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व बारामती पंचायत समितीच्यावतीने तंबाखूविरोधी बालमहोत्सवाचे बारामतीत आयोजन करण्यात आले होते. रॅली काढून या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.आपल्या देशात दर सेकंदाला एक मुल तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करीत आहे. त्यामुळे ते व्यसनाधीन बनण्याचा धोका निर्माण होत आहे. 10 लाख लोकांचा मृत्यू तंबाखूमुळे होणार्‍या आजाराने होत आहे.

या समस्यांना नियंत्रणात आणण्यासाठी समाजात जनजागृती करण्याची सुरुवात बारामती येथून करण्यात आली. मएसो विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहरातून तंबाखूविरोधी रॅली काढली. यावेळी सलाम मुंबई फेडरेशनच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करुन रस्त्यावरचे तंबाखू व सिगारेटची होळीदेखील पेटवली.

close