कोल्हापुरात दुसर्‍यादिवशीही शिवसेनेचं आंदोलन

July 6, 2011 12:20 PM0 commentsViews: 3

06 जुलै

कोल्हापूर – सांगली हा रस्ता चौपदरीकरण व्हावा या मागणीसाठी शिवसेनेचं कोल्हापुरातल्या सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. आज आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी शिवसैनिकांनी शासनाचा निषेध म्हणून शासनाचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी आंदोलकांना पुतळा जाळण्याला विरोध करत पुतळा ताब्यात घेतला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झोंबाझोबी झाली. कोल्हापूरचे आमदार राजेश क्षिरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.

close