अकलुजला रंगलं तुकोबांच्या पालखीचे चौथ रिंगण

July 6, 2011 1:44 PM0 commentsViews: 15

06 जुलै

टाल मृदुगांच्या गजराने अवघ अकलुज दुमदुलंय. तुकारामांच्या पालखीचं चौथ रिंगण पार पडलं.आज सकाळी सरातीला नीरा स्नान झाल्यानंतर पादुकांनी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. सोलापूर जिल्ह्यातील हे पहिलं रिंगण आहे. पंढरपुरजवळ आल्यामुळे वारकर्‍यांचा उत्साह वाढलेला असतो.

ह्या उत्साहात हे रिंगण पार पडलयं. सुरवातीला झेंडेकरी,तुळशीवृंदावन आणि हंडा घेतलेल्या महिला. वीणेकरी,पखवाज आणि टाळकरी अशी रिंगण पार पडली. मानाच्या अश्वाने पालखिला प्रदक्षिणा घातली. त्या पाठोपाठ मोहिते पाटिलांचे दोन अश्वही धावले. तीनही अश्वांनी तुकोबारायांच्या पालखीचे दर्शन घेतले आणि रिंगण सोहळा संपला. आज पालखी अकलुजमध्ये मुक्काम करणार आहे.

close