सुपर कॉम्प्युटरला ‘युवा’ कॉम्प्युटरच बळ

July 6, 2011 5:03 PM0 commentsViews: 12

06 जुलै

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात परम सुपर कॉम्प्युटर बनवून भारताने आपणही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कमी नाही हे दाखवून दिलं. याच परम कॉम्प्युटरची नवीन आवृत्ती आहे युवा परम कॉम्प्युटर. या युवा परम कॉम्प्युटरला व्हिएतनाम,घाना,टांझानिया,रशिया या देशांमधून चांगलीच मागणी आहे.

हवामानाचा अंदाज, अंतराळाची माहिती, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य यासारख्या वेगवेगळ्या विषयातली माहिती हा कॉम्प्युटर देतो. पुण्याच्या सी डॅक सेंटरने हा कॉम्प्युटर बनवला. सी डॅकने 1991 मध्ये परम 8000 ही टेक्नोलॉजी बनवली.

यानंतर परम 9000,परम 10000,परम पद्म आणि आताची परम युवा अशा टेक्नोलॉजी बनवल्या आहेत. अनेक देशातून याला मागणी आहे. टांझानीया या देशाने हेल्थ आणि वेदर ऍप्लीकेशनसाठी परम युवाची खरेदी केली आहे तर रशियाने स्पेस क्राफ्टसाठी परम युवाला पसंद केले आहे.

1960 मध्ये देशातील पहिला कॉम्प्युटर अमेरिकेत तयार झाला. तोपर्यंतअमेरिका हा एकमेव देश होता जो सुपर कॉम्प्युटर बनवू शकला. 1980 मध्ये जेव्हा भारताने अमेरिकेला सुपर कॉम्प्युटरची मागणी केली तेव्हा अमेरिकेने तो देण्यास मनाई केली होती.

1991 मध्ये सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कम्प्युटिंग म्हणजेच सी डॅकने पहिला सुपर कॉम्प्युटर बनवला. या सुपर कॉम्प्युटरद्वारा हवामान अंदाज,ज्वालामुखी किंवा भूकंपाची तीव्रता किती आहे त्यामुळे किती नुकसान होऊ शकेल या सारख्या गोष्टींचा अंदाज सहज घेता येतो.

आतायाही पुढची टेक्नोलॉजी बनवत आहे जी बनवण्यासाठी देशातील 150 शास्त्रज्ञ काम करत आहेत.ही टेक्नोलॉजी 2012 मध्ये लॉंच होणार आहे.

close