चुकीचे औषध दिल्यामुळे 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

July 6, 2011 1:35 PM0 commentsViews: 3

06 जुलै

रत्नागिरीतल्या खेड तालुक्यातल्या पटवर्धन लोटे गावात चुकीचं औषध दिल्यामुळे एका 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. साई कृपा हॉस्पिटलमधील ही घटना आहे. आदेश शिंदे असं दगावलेल्या मुलाचे नाव आहे. त्याला उलट्यांचा त्रास होत होता. पण डॉक्टरांनी त्याला चुकीची औषधं दिली त्यामुळे त्याची तब्येत जास्तच बिघडली.

तरीही डॉक्टरांनी त्याला दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये हलवलं नाही आणि त्याचा मृत्यू झाला असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला. स्त्री रोग तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर नितीन शिंदे यांनी मुलावर औषधोपचार केल्याचंही त्याचे कुटुंबीय सांगत आहे. या घटनेनंतर गावकर्‍यांमध्ये संताप आहे. हॉस्पिटल तत्काळ बंद करण्याची मागणी गावकर्‍यांनी लावून धरली आहे. यापूर्वीही हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर निष्काळजीपणा केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

close