पद्मनाभ स्वामी मंदिरात संपत्तीचं शूटिंग करा !

July 6, 2011 5:27 PM0 commentsViews: 32

06 जुलै

केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिरातल्या खजिन्याची मोजणी करणार्‍या समितीने मीडियाशी बोलू नये असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्रावणकोरच्या राजघराण्याने याबद्दल सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. आणि खजिन्याची माहिती सार्वजनिक करू नये अशी विनंती केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने समितीच्या सदस्यांना जाहीर विधान करण्यावर बंदी घातलीय तसेच, खजिन्याच्या मोडणीच्या प्रक्रियेचं व्हिडिओ आणि फोटो शूटिंग करावे असे आदेशही दिले आहेत. सहा वेगवेगळ्या तळघरांत सापडलेल्या खजिन्याची यादी तयार करा, असंही कोर्टाने सांगितले आहे.

close