बुलडाण्यात ‘लेक माझी’ अभियान

July 6, 2011 3:05 PM0 commentsViews: 178

06 जुलै

बीड जिल्ह्यात स्त्री भ्रूण एकपाठोपाठ सापडलेल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. स्त्री भ्रूण हत्येचा मुद्दा राज्यात ऐरणीवर आला. यावर बेटी बचाव अभियानाला सुरुवातही झाली. बुलडाणा जिल्हातही या विरोधात लेक माझी फोरम स्थापन करण्यात आला आहे. या फोरममध्ये शहरातील डॉक्टर, वकिल समाजसेवक , विविध सामाजिक संघटना आणि पत्रकार यांचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वत्र स्त्री भ्रूण हत्येला आळा घालण्यासाठी तसेच या विषयी समाजात जनजागृती होण्यासाठी चर्चासत्रांचा धडाका लावण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये या विषयी जनजागृती व्हावी म्हणून महाविद्यालयात चर्चासत्र घेतले जाताहेत. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठीचा हा राज्यातील पहिला अभिनव कार्यक्रम आहे ही चळवळ लवकरच राज्यात लोकचळवळ होईल अशी आशा सदस्यांनी केली.

close