सुगंधी दुधाच्या साठवणुकीसाठी पालिका करणार 1 कोटी खर्च

November 13, 2008 9:05 AM0 commentsViews: 9

13 नोव्हेंबर, मुंबई सुर्वणा दुसाणे सुगंधी दुधातून होणारी विषबाधा रोखण्यासाठी महापालिकेनं नामी उपाय शोधून काढला आहे. सुगंधी दुधाच्या साठवणुकीसाठी विशेष कपाट बनवणार असल्याचं अतिरिक्त आयुक्तांनी म्हटलंय. ताडदेवच्या शाळेत सुगंधी दुधामुळे अपचन होउन 11 मुलांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.दुधातून विषबाधा होत असल्याच्या घटनांची नेहमीचीच पुनरावृत्ती रोखण्यासाठी ही योजना सुरू करत असल्याचं महापालिकेनं म्हटलंय. 11 नोव्हेंबरला ताडदेवच्या पालिका शाळेतील 11 मुलांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं होतं. बोरिवलीत असा प्रकार घडू नये, म्हणून तिथल्या नगसेविका डॉ अजंता यादव यांनी दुधाची साठवणूक कशी होते, याची पाहणी शाळेत केली. सुंगधी दुधाबाबत बोलताना नगरसेविका यादव म्हणाल्या की प्रत्येक शाळेमध्ये रेफ्रिजरेटर असण्याची गरज आहे. एक वर्षात तीनदा दुधातून विषबाधेचे प्रकार घडलेत. पण मुंबई महापालिकेत सत्ता असणार्‍या शिवसेना- भाजपचा आग्रह आहे की, हरयाणा इथल्या कंपनीकडून येणारं हे दूध वाटप बंद होऊ नये. म्हणून पालिका प्रशासनानं आता नामी शक्कल काढली आहे. ' उंदीर, घुशीपासून सामना करता येईल, अशी विशेष प्रकाराची कपाट बनवण्याचं टेंडर आम्ही काढतोय. त्यासाठी त्या कपाटाची डिझाईनही करण्यात आली आहे ',असं अतिरिक्त आयुक्त माधव सांगळे यांनी सांगितलं. मनपा शाळेत येणार्‍या दुधाचे टेट्रापॅक हरयाणातुन येतं. पण सुरक्षेच्यादृष्टीनं काळजी घेण्यात मनपा कमी पडली आहे. शाळेतील मुलांना रोज दूध हवयं, त्याच वाटपही नीट होतंय. पण समस्या हीच आहे की, कोल्ड स्टोरेजची व्यवस्था महापालिका शाळांमध्ये नाही आणि म्हणूनच वारंवारं अपचनाचे प्रकार वाढत आहेत. मुलांना मात्र या वादाची माहिती नाही. त्यांना सुगंधी दुधाची चव चांगली लागतेय. टेंडर निघून प्रत्यक्षात कपाट येईपर्यंत अजून काही महिन्याचा कालावधी जावा लागेल. दरम्यानच्या काळात पुन्हा विषबाधेचे प्रकार घडले तर त्याची जबाबदारी महापालिकेचीच असेल.

close