निषेध म्हणून अधिकार्‍याच्या अंगावर कुत्री सोडली

July 6, 2011 3:45 PM0 commentsViews: 5

06 जुलै

मिरजमध्ये भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे काल एका मनोरुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा विरोध म्हणून शिवसेनेनं आज महापालिका कार्यालयात अजब आंदोलन केलं. शिवसेना कार्यकर्त्यांनी महापालिका अधिकार्‍यांच्या अंगावर भटकी कुत्री सोडली. सांगली शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला. ही कुत्री लोकांवर हल्लेसुद्धा करतात. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे. पण महापालिका या कुत्र्यांचा बंदोबस्त करत नाही. याचाचा निषेध म्हणून शिवसेना कार्यकर्त्यांनी महापालिका कार्यालयात जाऊन सहाय्यक आयुक्त धरमसिंग यांच्या अंगावर भटकी कुत्री सोडली.

close