मनसेच्या आमदारांनी प्रकरण बाहेर काढावीत – अजित पवार

July 7, 2011 9:38 AM0 commentsViews: 5

07 जुलै

मनसेचे विधानसभेत 12 आमदार आहेत त्यांनी माझ्याबद्दल काही पुरावे असतील तर बाहेर काढावी.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विधान करणे चुकाचे आहे असं प्रतिआव्हान अजित पवार यांनी केलं आहे. लोकांना आवडणारी विधान करणे सोप असतं पण पुरावे नसताना भाषण करणे चुकीचं आहे. अस मत ही अजित पवार यांनी नाशिकमध्ये व्यक्त केलं.

गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये राज ठाकरे यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपालाचा मुद्दाबाजूला ठेवावा आणि महाराष्ट्रात लक्ष घालावे. पवार भुजबळ यांच्या खात्यातील प्रकरणे बाहेर काढावीत असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होतं. अण्णांनी ही मोहीम हाती घेतल्यास मनसे अण्णांच्या पाठिशी अख्खा महाराष्ट्र उभा करीन असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं होतं.

आज राज यांचा विधानाचा समाचार घेत अजितदादांनी राज ठाकरेंना प्रतिआव्हान केलं आहे. मनसेच्या आमदारांनी माझ्या विरोधात पुरावे असतील तर सादर करावी उगाच जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या खांद्यावर ठेवून विधान करू नये. अण्णा हजारे यांनी देशातील भ्रष्टाचाराविरोधात लढा देत आहे. त्यांना आपला आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. भ्रष्टाचाराचा आम्ही विरोध करतो असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.

close