राहुल गांधींच्या पदयात्रेत पिस्तूल बाळगणार्‍या तरूणाला अटक

July 7, 2011 11:06 AM0 commentsViews: 2

07 जुलै

उत्तर प्रदेशात राहुल गांधी यांच्या पदयात्रा अंतिम टप्प्यावर आली असताना एक पिस्तूल बाळगणार्‍या तरूणाला अटक करण्यात आली आहे. एसपीजीने या युवकाला अटक केली आहे. हरिष असं या तरुणाचं नाव असून तो राजस्थानचा आहे. त्याच्याकडे पिस्तुलचे लायसन्सही आहे. मात्र हा तरूण पिस्तूल घेऊन पदयात्रे सहभागी का झाला यांची चौकशी पोलीस करत आहे.

राहुल गांधींचा दौरा म्हटलं की पोलीस यंत्रणेला डोळ्यात तेल घालून पहारा देण्याची वेळ. त्याला कारण ही तितकेच जमेचं आहे. कारण काँग्रेस पक्षाचे युवराज राहुल गांधी जनतेपर्यंत पोहचण्यासाठी थेट त्यांच्यात मिसळून जातात. कधी त्यांच्या घरी जेवण करणं, तर कधी लोकांशी गप्पा मारणे हे इथंच थांबत नाही तर लोकांची घरी बाजेवर निंवात झोप काढण्यासही युवराज मागेपुढे पाहत नाही. राहुला यांचा वागण्याचा हेतू जरी काही नसला तरी सुरक्षा यंत्रेणवर चांगलाच ताण पडतो. आजच्या पदयात्रेत एक तरूण पिस्तूल घेऊन सहभागी झाला होता. काही काळनंतर या तरूणाकडे पिस्तूल आहे असे कळताच पोलिसांनी झडप घालून तरूणाला ताब्यात घेतलं.

close