झीज रोखण्यासाठी विठोबांची उत्सवमूर्ती तयार

July 7, 2011 11:41 AM0 commentsViews: 3

07 जुलै

विठ्ठलाच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी विठ्ठलाची पंचधातूची हुबेहूब उत्सवमूर्ती तयार झाली आहे. यामुळे भाविक महापूजा करु शकणार आहेत. पूजा आणि अभिषेकामुळे या मूर्तीची झीज झाली होती. आषाढी एकादशीच्या दिवशीची पूजा मुख्य मूर्तीवरच होणार आहे. आता तयार झालेली उत्सवमूर्ती ही भाविकांच्या महापूजेसाठी आहे.

पुरातत्व खात्याच्या निर्देशानुसार आणि मंदिर समिती सदस्य आणि वारकरी प्रतिनिधींच्या पसंतीनूसार ही मुर्ती तयार करण्यात आली. ही मूर्ती आषाढी एकादशीला श्री विठ्ठल मंदिर व्यवस्थापनाकडे देण्यात येणार आहे. गेल्या चार वर्षापासून बंद असलेली विठ्ठलाची महापुजा सुरु करण्यातील अडचण दूर होणार आहे. या मूर्तीचे वजन पन्नास किलो, उंची अडीच फूट आहे. यात 250 ग्रॅम सोने, 500 ग्रॅम चांदी आणि 36750 ग्रॅम तांबे या धातंूचा वापर करण्यात आला.

close