..आणि संदीपचे स्वप्न होणार साकार

July 7, 2011 11:55 AM0 commentsViews: 7

07 जुलै

जागतिक अपंग तिरंदाजी स्पर्धेत खेळण्याचे नागपूरच्या संदीप नारायन गवई या तिरंदाजाचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. इटलीतील टुरीन येथे येत्या 10 जुलैपासून जागतिक अपंग तिरंदाजी स्पर्धा सुरू होत आहेत. या स्पर्धेतील सहभागासाठी संदीपला सव्वा लाख रुपयाची गरज आहे.

संदीपची ही व्यथा आयबीएन लोकमतने मांडल्यावर त्याच्याकडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे. आतपर्यंत त्याला 45 हजार रुपयांची मदत मिळालेली आहे. त्याने संदीपचा उत्साहही वाढला.

स्पर्धेच्या तयारीसाठी तो पुण्यात आयोजित सरवा शिबीरातही दाखल झाला. पण त्याला अजूनही पाऊन लाखाची गरज आहे. उमीद पे दुनिया कायम आहे असा विश्वास व्यक्त करत त्याने नेटाने आपला सराव सुरू केला.

close