विलासराव देशमुख – वेंगसरकर यांच्या लढत

July 7, 2011 1:53 PM0 commentsViews: 2

07 जुलै

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी दिलीप वेंगसरकर यांनी आपलं पॅनेल जाहीर केले आहे. दिलीप वेंगसरकर स्वत: अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. तर मिलिंद रेगे उपाध्यक्षपदाचे उमेदवार असणार आहेत. खजिनादर पदासाठी रवी मांद्रेकर यांना उमेदवारी देण्यात आली.

तर संयुक्त सचिवपदासाठी चंद्रकांत पंडित वेंगसरकर पॅनेलचे उमेदवार असतील. पवार महाडदळकर गटानं कालचं आपलं पॅनेल जाहीर केलं. त्यामुळे आता अध्यक्षपदासाठी वेंगसरकर आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्यात थेट लढत रंगणार आहे. संयुक्त सचिवपदासाठी आज लालचंद राजपूत यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केल्यामुळे आता दोन जागासाठी एकूण चार उमेदवार उभे असतील.

तर अध्यक्षपदासाठी विलासराव देशमुख यांनी अखेर अर्ज दाखल केला आहे. पवार-महाडदळकर ग्रुपने अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार जाहीर केला नाही.आणि त्यामुळे विलासरावांना आपला पाठिंबा असल्याचंही या ग्रुपने सांगितलं आहे. त्यातच माजी क्रिकेटर लालचंद राजपूत यांनीही अपक्ष म्हणून संयुक्त सचिव पदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. आणि विलासराव देशमुख यांनीही लालचंद यांना आपला पाठिंबा दर्शवला. एकंदरितच या समीकरणांमुळे एमसीएची यंदाची निवडणूक रंगतदार होईल हे नक्की.

close