हुंड्यासाठी महिलेला अमानुष मारहाण

July 7, 2011 2:23 PM0 commentsViews: 4

07 जुलै

सांगलीत हुंड्यासाठी महिलेला अमानुष मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे ज्या महिलेला मारहाण करण्यात आली तिचा नवरा पोलीस उपनिरीक्षकाची परिक्षा नुकतीच पास झाला आहे. तो अजून नोकरीत रूजू व्हायचा आहे. दुकान टाकण्यासाठी म्हणून महिलेच्या सासू-सासर्‍यांनी तिला माहेरुन 1 लाख रुपये आणायला सांगितले.

पण हे पैसे मिळाले नाही, म्हणून सासू-सासर्‍यांनी तिला बेदम मारहाण केली. सासू-सासरे एवढ्यावरच थांबले नाही तर तिला चटकेही दिले. याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यासाठीसदरील महिला गेली असता पोलिसांनी तक्रार नोंदवायला टाळाटाळ केली.

मात्र ही बाब काही स्थानिक पत्रकारांच्या कानी पडली पत्रकारांनी पुढाकार घेतल्यामुळे अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपी पती योगेश गोरे आणि सासू सुभद्रा गोरे यांना अटक केली. विश्रामबाग पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहे.

close