गगन नारंगचा नेमबाजीत विश्वविक्रम

November 13, 2008 9:06 AM0 commentsViews: 2

13 नोव्हेंबर, दिल्लीदिग्विजयसिंग देवनेमबाजीत सहाशे पैकी सहाशे पॉइंट्स मिळवण्याची किमया ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणार्‍या अभिनव बिंद्रालाही करता आली नव्हती. पण नुकत्याच बँकॉक मध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत गगन नारंगने दहा मीटर एअर रायफल प्रकारात हा पराक्रम केला. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये नारंग फायनलमध्येही प्रवेश नाही करु शकला. पण या कामगिरीमुळे ऑलिम्पिकमधलं अपयश थोडंफार धुऊन निघालंय. गगनसाठी हा वर्ल्डकप विजय अत्यंत महत्त्वाचा होता. ऑलिम्पिक पूर्वीही तो टॉप फॉर्ममध्ये होता..पण तांत्रिक कारणांसाठी ऑलिम्पिक अंतिम फेरीतला त्याचा प्रवेश हुकला. आणि प्रेक्षकात बसून त्याचाच साथीदार अभिनव बिंद्राला गोल्ड जिंकताना पहाण्याची वेळ त्याच्यावर आली. पण ऑलिम्पिकमधल्या पराभवामुळे गगनची जिद्द आणखी वाढली. त्याचाच फायदा त्याला या स्पर्धेत झाला. आता तर लंडन ऑलिम्पिकची तयारीही त्याने सुरु केली आहे.अर्थात ऑलिम्पिकचं आव्हान कधीच सोपं नसतं. पण आता लंडनमध्ये गगनला पाठबळ असेल ते सहाशे पैकी सहाशे पॉइंट्स मिळवण्याच्या त्याच्या रेकॉर्डचं. लंडन ऑलिम्पिकमध्येही त्याने या कामगिरीची पुनरावृत्ती करावी, अशीच अपेक्षा भारतातील क्रीडाप्रेमी करत असतील.

close