माळीनगरला सजला तुकोबांच्या पालखीचा उभा रिंगण सोहळा

July 7, 2011 2:34 PM0 commentsViews: 8

07 जुलै

माळीनगरला आज तुकोबांच्या पालखी सोहळा सजला तो बहारदार उभ्या रिंगण कार्यक्रमाने. मानाच्या अश्वाच्या फेरीआधी वारकर्‍यांनी धमाल खेळ रंगवले. फुगड्या, नाच याबरोबरच टाळ मृदंगाच्या गजरात तल्लीन झालेले वारकरी पाहून भाविकही हरखून गेले होते.

त्यानंतर तुकोबारायांचा मानाचा अश्व धावला तो दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो वारकर्‍यांमधून. त्यावेळी अश्वखुराने उखडलेली माती कपाळी लावण्यासाठी वारकर्‍यांची एकच गर्दी उडाली.

त्यानंतर मग निशाण आणि जरी पटका घेतलेल्या अश्‍वाची रिंगणातून धाव झाली. त्यावेळीही वारकर्‍यांनी एकच जल्लोष केला. अश्वांच्या दौडीनंतरही वारकर्‍यांचे खेळ रंगले. माळीनगरचा हा सोहळा गावकर्‍यांनाही चांगलाच सुखावून गेला.

close