एसटीची 10.34 टक्के भाडेवाढ; उद्या मध्यरात्रीपासून लागू

July 7, 2011 5:17 PM0 commentsViews:

07 जुलै

केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरवाढ केल्यानंतर दोन आठवड्यापूर्वी डिझेल, रॉकेल आणि घरघुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली. परिणामी महाराष्ट्राच्या गावागावात पोहचणार्‍या लाल परीचा प्रवास आता महाग झाला आहे. एसटीनं सरासरी 10.34 टक्के भाडेवाढ केली.

उद्या मध्यरात्रीपासून ही नवी दरवाढ लागू होणार आहे. डिझेलची दरवाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय मागील आठवड्यातच घेतला जाणार होता. यासंदर्भात एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यांची बैठकीही पार पडली होती. डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळाचे वर्षाला 128 कोटींचे नुकसान होणार आहे. एसटीला दरदिवशी 10 ते 11 लाख लीटर डिझेल लागतं. या दरवाढीमुळे दररोज 30 ते 33 लाखांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

close