जे.डे हत्याप्रकरणी आठ आरोपींना मोक्का

July 8, 2011 4:27 PM0 commentsViews:

8 जुलै

पत्रकार जे.डे हत्याप्रकरणी सर्व आठ आरोपींना मोक्का लावण्यात आलाय. मोक्का लावल्यानंतर या सगळ्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांना 11 जूलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. मिड डे चे इन्व्हेस्टीगेटीव एडिटर जे. डे यांची 11 जून रोजी हत्या झाली होती. त्याप्रकरणी विनोद असरानी उर्फ विनोद चेंबूर या बुकीसह आणखी 7 जणांना अटक करण्यात आलीय. विनोद चेंबूर हा बिल्डरही आहे आणि त्याचे छोटा राजनशी थेट संबंध असल्याचा आरोप आहे. छोटा राजनचा गुंड सतीश काल्याला त्यापूर्वीच अटक करण्यात आली होती. छोटा राजनलाही याप्रकरणात आरोपी करण्यात आलंय. छोटा राजन आणि विनोद चेंबूर हे संवाद साधण्यासाठी स्पाय कार्डचा वापर करत होते. ते स्पाय कार्ड शोधण्याचं काम सध्या पोलीस करतायत.

close