फेसबुकची लवकरच व्हिडिओ चॅट सेवा

July 7, 2011 6:33 PM0 commentsViews: 8

07 जुलै

गूगल आणि फेसबुक यांच्यातील सायबर युद्ध आता पेटलं आहे. गुगलच्या गुगल प्लस या सोशल नेटवकिर्ंग साइटची चांगलीच हवा झाली. फेसबुकने याला टक्कर द्यायची तयारी सुरू केली.आता फेसबुकवरून व्हिडिओ चॅटिंग करता येणं शक्य होणार आहे. यासाठी फेसबुकने स्काईपसोबत हातमिळवणी केली. आणि अशा अनेक सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. पण सध्या तरी फेसबुक युजर्स त्यांच्या फेसबुक चॅटवर आता व्हिडिओ चॅटिंगही करू शकणार आहेत. आणि यामध्ये एकाचवेळी अनेक व्यक्तींशीही चॅटिंग करता येईल. पण या सेवेसाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

close