‘लवासा’ प्रकरणी अण्णांचे पंतप्रधानांना पत्र

July 7, 2011 6:42 PM0 commentsViews: 2

07 जुलै

लवासाच्या मुद्द्यावर अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहिलं. लवासा प्रकल्प बेकायदेशीर आहे. त्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी अण्णांनी केली.

'लवासा' प्रकल्पामध्ये पर्यावरण कायद्याचे उल्लंघन झाल्याचे केंद्राच्या तज्ज्ञ समितीने मान्य केलं आहे. यासंदर्भात 25 नोव्हेंबर 2011 ला 'लवासा' ला नोटीस पाठवण्यात आली. तरीही पर्यावरण मंत्रालय हा प्रकल्प नियमित करण्यासाठी प्रयत्न करतंय. हे लोकशाहीच्या विरोेधी आहे आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचाच हा प्रकार आहे.

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांची एक बैठक झाली. यात 'लवासा'च्या सगळ्या मागण्या मान्य करण्यात आल्या. यामध्ये 'लवासा' ला विशेष दर्जा देण्याचाही निर्णय झाला. 'लवासा' साठी कायद्यात बदलही करण्यात आले. पण या प्रकरणी कुणावरही करावाई झालेली नाही किंवा चौकशीही झालेली नाही. तरी याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश आपण द्यावे.

close