सोलापूर जिल्हा बँकेने 2 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप

July 9, 2011 10:05 AM0 commentsViews: 54

09 जुलै

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील संचालक मंडळाने नाबार्ड आणि आरबीआयचे नियम धाब्यावर बसवून दोन हजार कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी केला. सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन राऊत यांनी ऑडिट रिपोर्टच्या आधारे भ्रष्टाचाराची माहिती दिली.

बँकेच्या संचालक मंडळाने बँकेतील पैशाचा अपव्यय आपल्या सोयीने करीत आपल्या सग्या-सोयर्‍यांच्या संस्थांना कर्जवाटप केलं आहे. तसेच आर्थिक दिवाळखोरीत निघालेल्या साखर कारखान्यांना, शैक्षणिक संस्थांना कर्जवाटप केले आहे. त्यामुळे बँकेतील ठेवी आणि शेतकर्‍यांच्या हिताला बाधा आणणारे निर्णय घेतल्याचे राऊत यांनी आरोप केले. यावरून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी राऊत यांनी केंद्रीय स्तरावर तक्रार दाखल केली आहे.

close