डॉमिनिका टेस्टमध्ये भारताची आघाडी

July 9, 2011 10:34 AM0 commentsViews: 1

09 जुलै

डॉमिनिका टेस्टमध्ये पहिल्यांदा पूर्ण नव्वद ओव्हरचा खेळ झाला. आणि भारतीय बॅट्समननी त्याचा पुरेपूर फायदा उचलला. अभिनव मुकुंद, रैना, लक्ष्मण आणि कॅप्टन धोणी या चौघांनी हाफ सेंच्युरी केली. आणि त्याच्या जोरावर तिसर्‍या दिवस अखेर टीमने सहा विकेट गमावत 308 रन केले आहे. टीमकडे आता 104 रनची आघाडी आहे.

दिवसाची सुरुवात मात्र टीमसाठी फारशी चांगली नव्हती. राहुल द्रविड आणि मुरली विजय झटपट आऊट झाले. पण त्यानंतर सगळ्यांनीच पार्टनरशिप केल्या. व्ही व्ही एस लक्ष्मणने कारकिर्दीतली 51वी हाफ सेंच्युरी ठोकली. तो मोठा स्कोअर करणार असं वाटत असताना विचित्र पद्धतीने तो स्टंप आऊट झाला.

भारताची अवस्था त्यामुळे पाच विकेटवर 172 अशी झाली होती. पण धोणी आणि रैनाची जोडी जमली आणि भारताने आरामात आघाडी मिळवली. रैनाने पन्नास रन केले. तर धोणी 65 आणि हरभजन 12 रनवर खेळत आहे. आता चौथ्या दिवशी टीमचे लक्ष असेल ते आघाडी जास्तीत जास्त वाढवण्यावर.

close