युपीत शेतकर्‍यांच्या जमिनी जबरस्तीने ताब्यात घेतल्या – राहुल गांधी

July 9, 2011 12:38 PM0 commentsViews: 1

09 जुलै

मायावती यांच्या उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी आज शक्तिप्रदर्शन केलं. अलिगडमध्ये आज काँग्रेसची किसान महापंचायत झाली. त्यात बोलताना राहुल गांधी यांनी अपेक्षेप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारवर हल्लाबोल केला. उत्तर प्रदेश सरकारचे शेतकर्‍यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.

शेतकर्‍यांचा विकासाला विरोध नाही. पण, त्यांच्या जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेतल्या जातात. मात्र त्यांना योग्य मोबदला मिळत नाही असा आरोप राहुल गांधी यांनी केला. भूसंपादन कायदा कालबाह्य झाला. तो बदलण्याची गरज राहुल गांधींनी व्यक्त केली.

चार दिवसांच्या पदयात्रेनंतर राहुल गांधी आज अलिगडमध्ये पोचले. तिथं काँग्रेसची किसान महापंचायत पार पडली. यासाठी 20 हजार शेतकरी जमले होते.या पंचायतीला काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या प्रदेशाध्यक्ष रिटा बहुगुणा आणि उत्तरप्रदेशातील अनेक नेते हजर होते.

close