राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवार ठरवण्यावर दिल्लीत मंथन

July 9, 2011 12:46 PM0 commentsViews: 1

09 जुलै

महाराष्ट्रातून राज्यसभेवर कोणाची वर्णी लागणार याविषयी दिल्लीत चर्चा सुरू आहे. राज्यसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मोहन प्रकाश आणि ऑस्कर फर्नांडीस यांची बैठक सुरू आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर रिकाम्या झालेल्या जागेसाठी कोणाची निवड करायची यासाठी ही बैठक होत आहे. प्रादेशिक आणि सामाजिक समतोलाचा विचार करूनच उमेदवार ठरवू असं माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

राज्यसभेसाठी चर्चेतील नावं

- शिवराज पाटील- वायएसपी थोरात- माँटेकसिंग अहलुवालिया- मुजफ्फर हुसेन

close