जळगावमध्ये पावसाची दमदार हजेरी

July 9, 2011 12:05 PM0 commentsViews: 139

09 जुलै

जळगांव जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तरीही बर्‍याच धरणातील पणलोट क्षेत्रात अजून ही पाण्याची पातळी खालावली आहे. हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्र पूर्ण भरलं आहे. सतत 3 दिवस सुरु असलेल्या पावसाचा फायदा हा हतनूर धरणाला झाल्याने धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहे.

तापी आणि पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाचा फायदा हा हतनूर धरणाला झाला आहे. तापी नदीवर असलेल्या या हतनूर धरणातील 6 दरवाजे अर्ध्या मिटरने मिटरने उघडण्यात आले असून प्रति सेकंद जवळपास 7100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग या धरणातून आत्ता सुरु आहे. धरणातून सोडण्यात आलेलं हे पाणी प्रकाशामार्गे सुरतच्या उकई डॅम पर्यंत जातं.

close