नाशकात 400 पोती गहू जप्त

July 9, 2011 11:31 AM0 commentsViews: 1

09 जुलै

नाशिक रोड पोलिसांनी काळ्या बाजारात विकला जाणारा 400 पोती गहू पकडला आहे. विल्होळीच्या एका खाजगी गोडाऊनमधून तीन ट्रक गहू सावरकर उड्डाणपुलाजवळून नेण्यात येत होता. नाशिकरोड पोलिसांनी या ट्रकला अडवलं असता चालकांनी संशयास्पद उत्तरं दिली. त्यावेळी रेशनचा गहू पोती बदलून काळ्या बाजारात नेत असल्याचं उघडकीस आलं. पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. या तीन ट्रक्समधून 400 पोती गहू जप्त करण्यात आला.

close