वारी सोहळ्याच्या तोंडावर पंढरपूरला दुषित पाण्याचा पुरवठा

July 9, 2011 1:56 PM0 commentsViews: 7

09 जुलै

ऐन आषाढीवारी सोहळ्याच्या तोंडावर पंढरपूर शहराला दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह वारकर्‍यांना उलट्या आणि पोटदुखीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. म्हणून नागरिकांनी पाणी उकळून प्यावं आणि गाळून प्यावं असं आवाहन नगर परिषदेने केले आहे. विशेष म्हणजे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पिवळसर तांबूस रंगाचे पाणी सध्या पंढरपूर शहराला पुरवलं जातं. सध्या पाणी शुद्धीकरणाचे प्रयत्न सुरु आहेत असा दावा जलशुद्धीकरण प्राधिकरणाकडून करण्यात येतोय.

close