वाखरीत रंगले शेवटचे गोल रिंगण

July 9, 2011 3:28 PM0 commentsViews: 4

09 जुलै

संपुर्ण वारी सोहळ्यातील सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम आज रंगला तो पंढरपूरच्या वेशीवर. वाखरीत आज सगळ्या पालख्यांचे एकक असं गोल रिंगण झालं. वारी सोहळ्यातीलं हे सगळ्यात मोठं रिंगण होत. आज दुपारी सव्वाचारच्या सुमारास बाजीरावची विहीर इथे सगळ्‌या पालख्या एकत्र आल्या. सर्वप्रथम झेंडेकरी धावला आणि त्यापाठोपाठ अश्वाने धाव घेतली.

मानाचा अश्व आणि माऊलींच्या अश्व यांच्यातल्या पाठशिवणीच्या खेळाने उपस्थितांच्या नजरेचे पारणे फिटले. सदाशिवनगरच्या रद्द झालेल्या रिंगणाचे सावट ह्या रिंगणांवर पडलं नाही . दरवर्षीइतक्याच उत्साहात वैष्णवांच्या ह्या मेळ्यानं रिंगणाला हजेरी लावली.

close