लाच घेणार्‍या इन्कम टॅक्स कमिशनरला अटक

July 9, 2011 3:51 PM0 commentsViews: 3

09 जुलै

इन्कम टॅक्स भरा असं सांगणारे इन्कम टॅक्स कमिशनर स्वत:चं 'इन्कम' (लाच) घेतांना पकडले गेले. रामफुल मीना असं या लाचखोर कमिशनरचे नाव आहे. आणि ते मुंबईत अपील विभागाचे कमिशनर आहेत. डी. बी. रिऍल्टीकडून अडीच लाखांची लाच घेताना सीबीआयने काल रात्री त्याला अटक केली. डी. बी. रिऍल्टीने इन्कम टॅक्स रिटर्नबाबत अपील केलं होतं. त्याचा निकाल डी. बी. रिऍल्टीच्या बाजूने देण्यासाठी रामफुल मीना आणि त्यांच्या सहकार्‍यांनी लाच मागितली होती.

close