चुरशीच्या सामन्यात पाकिस्तानचा विजय

November 13, 2008 4:51 AM0 commentsViews: 3

13 नोव्हेंबर, अबुधाबीपाकिस्तान आणि वेस्ट इंडिज दरम्यान अबुधाबी इथं झालेल्या वन डे क्रिकेट मॅचमध्ये पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा चार विकेट्स राखून पराभव केला. कामरान अकमलने निर्णायक क्षणी फटकेबाज नऊ बॉल्समध्ये 24 रन्स करत पाकला विजय मिळवून दिला. शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला विजयासाटी सतरा रन्स हवे होते. पण अकमलने वेस्ट इंडिजचा फास्ट बॉलर जेरेमी टेलरच्या बॉलवर दोन सलग सिक्स ठोकले. त्यानेच मग ओव्हरच्या पाचव्या बॉलवर पाकिस्तानला विजय मिळवून दिला. त्यापूर्वी, कॅप्टन ख्रिस गेलच्या 113 रन्सच्या जोरावर वेस्ट इंडिजने पन्नास ओव्हर्समध्ये 294 रन्स केले. तर पाकिस्तानतर्फे खुरम मंझूर आणि शोएब मलिक यांनी हाफ सेंच्युरी केल्या. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज दरम्यान आबूधाबी इथं तीन वन डे मॅच खेळल्या जाणार आहेत. पहिली मॅच जिंकून पाकिस्तानने सिरीजमध्ये आघाडी घेतली आहे.

close